
Wheat Price । देशात मोठ्या प्रमाणावर गव्हाचे (Wheat) उत्पादन घेतले जाते. अशातच मागील वर्षीपासून गव्हाच्या वाढत्या किमतीत कमालीची वाढ (Wheat Price Hike) होत आहे. वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत आहे. सरकारकडून या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. किमतीत पुन्हा वाढ होऊ नये म्हणून 13 मे 2022 पासून गव्हाच्या निर्यातीवर बंदी (Wheat export ban) देखील घातली आहे. (Latest Marathi News)
गव्हाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ (Wheat Rate) झाली आहे. राजस्थानमध्ये देशातील 9.9 टक्के गव्हाचे उत्पादन घेण्यात येते. या राज्यात गव्हाचा कमाल दर 5,325 रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे. वाढलेल्या किमतींमुळे जरी शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असले तरी सर्वसामान्यांना तो पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावा लागत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, पीक वर्ष 2022-23 साठी तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, गव्हाचे उत्पादन 1127.43 लाख टन इतके आहे.
Maratha Reservation । “मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नाही” पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
उत्पादनात वाढ
दरम्यान, मागील वर्षी पेक्षा यंदा 50.01 लाख टन उत्पादन जास्त आहे. 1 जुलै रोजी गव्हाचा साठा 301.45 लाख टन होता आणि बफर स्टॉक निकष 275.80 लाख टन होता. उत्पादन जास्त असूनही किमती वाढल्या कशा? असा सवाल आता निर्माण होत आहे. यावर्षी खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत गव्हाची तीन वेळा अनुदानित दराने विक्री केली आहे.
मर्यादा निश्चित
सर्व राज्यांमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत गव्हाच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. तसेच घाऊक व्यापाऱ्यांसाठी 3,000 टन गव्हाची साठा मर्यादा निश्चित केली आहे आणि रिटेल आउटलेटसाठी 10 टन तसेच मोठ्या रिटेल चेनसाठी 10 टन प्रति आउटलेटची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.