मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ( Shivsena) हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावरून राजकारणात चांगलाच गोंधळ सुरु आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. यामध्येच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे सध्या हे ट्वीट चर्चेत आलं आहे.
सोनू निगमचा जीव थोडक्यात वाचला; कार्यक्रमादरम्यान झाली धक्काबुक्की
राऊतांनी आपल्या ट्विटरवरून ‘थोरांचे विचार’ असं लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये थोर राजकीय विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की “सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते”, असं ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
ब्रेकिंग! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन; उडाली खळबळ
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
दरम्यान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. यासंबंधी आज ठाकरे गटाकडून ( Thackeray Group) याचिका दाखल करण्यात येणार असून कदाचित आजच यावर सुनावणी देखील होईल. कोणताही अर्ज न करताच काल (ता.20) काल ठाकरे गटाने न्यायालयात सुनावणीसाठी विनंती केली होती. यावरून ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडून फटकरण्यात आले होते.
माजी राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली; म्हणाले, “ही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या…”