अभिनेत्री करीना कपूर ( kareena Kapoor) ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या लुक व ग्लॅमरस अंदाजमुळे ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. दरम्यान बॉलिवूड मधील या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा चक्क मराठीत बोलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदी चित्रपट गाजवणारी करीना कपूरचे मराठी ऐकून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. यामध्ये तिने वेड म्हणजे काय ? सांगितलं आहे.
‘त्या’ यादीतील नेत्यांवर कारवाई सुरू; अनिल परब यांची संपत्ती जप्त
अभिनेता रितेश देशमुखने नुकताच करीनाबरोबरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये रितेश करीनाला विचारतो, “तुमच्यासाठी वेड म्हणजे काय?” त्यावर उत्तर देताना करीना म्हणते की , “वेड म्हणजे तुमच्या चित्रपटासारखं आहे. हा एक वेडेपणा आहे, एक नशा आहे, हा प्रेमासाठी असलेला वेडेपणा आहे. ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही.”
2024 च्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून कर्जत-जामखेड मध्ये लागली एक लाखाची पैज!
या व्हिडीओमधून करीनाने रितेश देशमुखला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दरम्यान ‘वेड’ (Ved) या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तर अभिनेत्री जेनेलिया हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या जोडीने या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट सध्या फळाला आले असून ‘वेड’ अगदी तीन दिवसांत 10 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला आहे.
मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम ! होतो लाखो रुपयांचा फायदा