रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणूक जिंकताच उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, “एवढ्या मोठ्या प्रभावातून…”

When Ravindra Dhangekar won the Kasba by-election, Uddhav Thackeray reacted by saying, "With such great influence..."

पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. या विजयाने कसब्यातील मागील 25 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला असून हा ऐतिहासिक विजय असल्याचे सांगितले जात आहे.

अभिजित बिचुकले ठरले फुसका बॉम्ब! पडली अवघी चार मते

या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर जिंकले याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला देखील काही हरकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कसब्याचा निकाल ऐकून अजित पवार म्हणाले, “माझी स्थिती आता कभी खुशी कभी गम…”

दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्या यशानंतर कसब्यातील मतदारांनी ‘ज्याच काम दमदार तोच आमदार’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत. ‘जर उमेदवार काम करणारा आणि प्रामाणिक असेल तर पक्षीय राजकारण कामी येत नाही’. हे या निवडणुकीने दाखवून दिल असल्याचं कसब्यातील मतदार म्हणत आहेत.

ज्याच काम दमदार तोच आमदार! ब्राम्हण केंद्रित पेठांमध्येच भाजपला मोठा धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *