बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये (Big Boss 16 ) रॅपर एमसी स्टॅनची चांगलीच चर्चा होती. परंतु, शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी यांपैकी कोणीतरी बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकवणार असे म्हंटले जात होते. मात्र रॅपर एमसी स्टॅनने या सीझनचे विजेतेपद पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यांनतर सातत्याने त्याचीच चर्चा सुरू आहे.
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार? काँग्रेसच्या अधिवेशनात केली मोठी घोषणा
नुकतंच एमसी स्टॅनने एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. लहानपणापासून त्याची असलेली प्रतिकूल परिस्थिती, रस्त्यावर जगताना त्याला मिळालेली शिकवण, गुन्हेगारी विश्व या सर्व गोष्टीबद्दल स्टॅनने या मुलाखतीमध्ये मानमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन गटांत कोयत्याने हाणामारी
दरम्यानच, स्टेनने लहानपणी त्याच्या आसपास घडलेल्या गुन्ह्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तो म्हणाला, “मी १५ वर्षांचा असेन. तेव्हा आसपास फार भयानक होतं. मी माझ्यासमोर एका व्यक्तीला सुरा मानेवरून फिरवताना तसेच कोयत्याने डोक्यावर घाव करताना पाहिलंय. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर तेव्हा जे घडलं ते पाहून माझी ३ दिवस झोप उडाली होती. त्यामुळे आज देखील मला त्या गोष्टी आठवल्या की खूप अस्वस्थ वाटतं.” असं एमसी स्टॅन म्हणाला आहे.