
आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon sessions) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे (Government) लक्ष वेधून घेतले. विरोधकांनी सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असा आरोप करत सभात्याग केला. त्यावरून आता सरकारविरोधात विरोधक एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
अधिवेशनात बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यातील शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. राज्यात बोगस बियाणांच्या टोळ्या फिरत असून या सरकारला फक्त मंत्रिमंडळाची काळजी आहे. शेतकरी संकटात असताना काही टोळ्यांची हप्तेखोरी सुरू आहे, असा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, सरकार क्षुल्लक गोष्टींसाठी दिल्लीला जात आहे. परंतु शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या दारात कधी जाणार? असा संतप्त सवाल थोरात यांनी राज्य सरकारला केला आहे. राज्यातील काही भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तसेच त्यांच्यासमोर पुन्हा बियाण्याचे संकट उभे राहिले असल्याची माहिती दिली.