Ajit Pawar । कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्यापासून अजित पवार गटावर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून एक वर्ष लोटले तरी अजूनही नेत्यांकडून पक्षातील अंतर्गत घटनांबाबत गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते. (Latest Marathi News)
Havaman Andaj । राज्यभर पावसाने पुन्हा घेतली विश्रांती? शेतकरी चिंतेत
बोलताना अजित पवार म्हणाले की, “आमच्यावर लोकांची काम करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही महायुतीत सामील झालो आहोत. खरंतर उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) सरकार ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी एखाद दुसरा आमदार सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं होत. महायुतीत सामील व्हा, असे या पत्रात लिहिलं होत. जर हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन,” असे अजित पवार म्हणाले.
Thackeray Group । ठाकरे गोटाला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला पदाचा राजीनामा
तसेच त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही (Maratha Reservation) भाष्य केले. “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत पवार म्हणाले,”तुम्हीसुद्धा एकेकाळी चार वर्ष मुख्यमंत्री होता, टीका करणं खूप सोपं आहे. जे कोणी टीका करत आहेत, ते कधी ना कधी राज्याचे प्रमुख होते. आत्ता जे सत्तेवर आहेत ते आहेतच. यातून कोणीच सुटणार नाही,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.