
भविष्याबद्दल सर्वांनाच चिंता असते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ती ही चिंता जरा जास्तच आहे. कारण नुकताच त्यांनी सिन्नर येथील एका मंदिरात जाऊन ज्योतिषाला आपला हात दाखवला. अनेक प्रयत्नांनी उभं केलेलं सरकार किती काळ टिकेल ही माहिती मिळवण्यासाठी शिंदेनी हे पाऊल उचलले. पुरोगामी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याची बातमी पसरल्याने त्यावरून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड टीका होत आहे.
एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यावरील संकट टळले; राजू शेट्टींनी घेतली नमती भूमिका
या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. रोजचे काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. खरंतर जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, असे म्हणत शरद पवारांनी शिंदेंवर टीका केली आहे.
शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या नेत्याने सोडला पक्ष
तसेच पत्रकार परिषदेदरम्यान राज्यात रंगलेल्या चर्चेवरून महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकित केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असे विचारण्यात आले असता, शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर देत शिंदेंना टोला लागवला आहे. मी जोतिषी नसल्याने सरकार कधी कोसळेल हे मला माहिती नाही. माझा या सगळ्यावर विश्वास नसून मी दौरा सोडून कुठे हात दाखवायला जात नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत.
आमदार शहाजीबापू यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार