मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या स्टाईल आणि तिच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे चर्चेत असते. तसेच अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या लग्नाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही फोटोंची मालिका शेअर केली. शिवाय अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात.
“सीएमआयई” अहवालात दिसून येते भयावह परिस्थिती; बेरोजगारीचा प्रश्न दिवसागणिक उग्र रूप धारण करतोय
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन हे दोघं टीव्ही विश्वातील पॉवर कपल म्हणून ओळख जातात. दरम्यान अता चाहते अंकिता आणि विकी कधी आई-वडील होतील या प्रतीक्षेत त्यांचे चाहते आहेत. एवढच नाही तर अनेक वेळा अंकिताला आई कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येतो. पण ती नेहमी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते.
नुकताच अंकिता ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या विशेष भागामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. तेव्हा जय भानुशालीने अंकिताला प्रश्न विचारला की, ‘सांगून टाक की तू सुपर मॉम (supar mom) कधी होणार आहेस?’यावर अंकिता उत्तर देत म्हणाली की, ‘मी स्वतःच अजून लहान बाळ आहे…’
ग्रामपंचायत आणि सरपंच पदाविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती !
त्यानंतर उषा नाडकर्णी म्हणाल्या की, ‘ये माझ्या मांडीवर झोप….’ त्यानंतर सेटवर सर्वजण पोट धरून हसू लागले. अंकिताने प्रोमो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यावेळी अंकिताने पांढरी साडी घातली आहे. या साडीत ती अप्रतिम दिसत आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी अंकिता आणि विकी हे दोघे विवाहबंधात अडकले.
Ajit Pawar: अजित पवारांनी भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींवर काढला चिमटा; म्हणाले, “याआधी…”