Site icon e लोकहित | Marathi News

‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, ‘या’ सरकारने नवविवाहीत महिलांना विचारला आगळाववेगळा प्रश्न; वाचा सविस्तर

'When will you get pregnant?', 'this' government asked newly married women a different question; Read in detail

चीन (China) हा देश जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा (population) देश म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या चीन देश आपली लोकसंख्या घटत (Decreasing population) असल्याबद्दल चिंतेत आहे. चीनपुढे ही चिंता इतकी मोठी आहे की, नवविवाहीत महिलांना (newly married women) फोन करून ‘तुम्ही गरोदर कधी होणार आहात’ अशी थेट विचारणा केली जात आहे. तसेच गरोदर (pregnant) होण्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला देखील फोनवरील अधिकारी देत आहेत.

मोठी बातमी! 10 नोव्हेंबरपासून राज्यात पूर्ण क्षमतेने ऊस गाळप होणार, यंदा 203 कारखाने गळीत हंगामात सहभागी

खरतर ही माहिती एका चीनी महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर आणखी एका चीनी महिलेने तिच्या सहकारी महिलेला आलेल्या कॉलबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, तिचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न झाले होते. तेव्हापासून तिला तुम्ही गरोदर कधी होणार आहात’ याबाबतीत दोन वेळा फोन आले आहेत.

फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला निघाला, मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला होणार उद्घाटन

2019 सालच्या आकडेवारीनुसार चीन लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या 1.44 अब्ज आहे. तर दुसऱ्या स्थानावरील भारताची लोकसंख्या 1.39 अब्ज आहे. दरम्यान महत्वाची बाब म्हणजे या 2019 सालच्या आकडेवारीनुसार 2023 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार आहे.तर साल 2050 पर्यंत चीनची लोकसंख्या 2.2 टक्क्यांनी घटणार आहे.

अकोल्यातील तिरडीवरुन उठलेल्या तरुणाचे धक्कादायक आणि विचित्र वास्तव समोर

विशेष म्हणजे चीनने 1970 ते 1980 च्या दशकात लोकसंख्या घटवण्यासाठी अनेक वेगवेगळी धोरणे राबवली. त्यामुळे आत्तापर्यंत चीनची लोकसंख्या घटू लागली; परंतु आता लोकसंख्या घटल्याने चीनच्या विकासाची प्रक्रियाही मंदावली .दरम्यान UN Department of Economic and Social Affairsच्या माहितीनुसार 1950 नंतर जगाची लोकसंख्या मंदगतीने वाढत आहे. त्यामुळे ही लोकसंख्या 2030 सालापर्यंत 8.5 अब्जांपर्यंत पोहोचेल. तर 2050 सालापर्यंत ही लोकसंख्या 9.7 अब्ज आणि 2080 सालापर्यंत 10.4अब्ज इतकी असेल.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती

Spread the love
Exit mobile version