शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्रासाठी श्रद्धेचा विषय आहे. शिवाजी महाराजांच्या वस्तू आजही विविध ठिकाणी जपून ठेवल्या गेल्या आहेत. या वस्तू त्यांच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव करून देतात. याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहेत. यासाठी राज्यसरकार आपले हातपाय हलवत असल्याचे दिसत आहे. खरंतर यामुळे शिवाजी महाराजांकडे किती तलवारी होत्या हा मुद्दा देखील चर्चेचा झालाय.
लहान मुलाच्या स्वप्नपूर्ती साठी राहुल गांधींचा पुढाकार; इंजिनीअर व्हायचे म्हणताच दिली लॅपटॉपची भेट!
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) युक्ती पेक्षा शक्तीने लढायचे. त्यांच्याकडे अनेक हत्यारे होती. यापैकी त्यांच्या तलवारी अधिक प्रसिध्द होत्या. आपल्या नेहमीच्या वापरात महाराज तीन तलवारी ठेवायचे. त्यांची नावे देखील महाराजांनी आराध्यदैवतांच्या नावाने ठेवली होती. तुळजा, भवानी आणि जगदंबा या महाराजांच्या तीन तलवारी होत्या. यापैकी एक तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात असून ती महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्यसरकार कडून प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित दोन तलवारी मात्र महाराष्ट्रातच आहेत.
धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता प्रसाद ओकने दिली माहिती
यातील तुळजा ही तलवार सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असून तिचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केले आहे. शहाजी राजे यांनी १६६२ साली शिवाजी महाराजांना तुळजा ही तलवार दिली होती. तसेच भवानी तलवार ही सातारा (Satara) येथील छत्रपतींच्या खासगी संग्रहालयात आहे. यावर ‘सरकार राजा शाहू’ असे कोरलेले आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या तलवारी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे.
काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश