शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर ( Manthan Camp of NCP) झाले. यावेळी शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून थेट शिर्डी येथे शिबिरास उपस्थित राहून अवघ्या महाराष्ट्राला थक्क केले. परंतु, शिबिराच्या सलग दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) उपस्थित राहिले नव्हते. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
शिर्डी: साईबाबा भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता थेट साईबाबांच्या समाधीला हात लावून घेता येणार दर्शन
पुण्यातील मावळ या ठिकाणी कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवरील नाराजी जाहीर केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “मागच्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे मी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमानात होतो. पण अजित पवार नाराज आहेत, अशा चर्चा उठवल्या गेल्या. पण मला काही खासगी आयुष्य आहे की नाही,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केलाय.
पुढे अजित पवार म्हणाले की, “कोणतेही कारण नसताना बदनामी आणि गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत. मी मागच्या सहा महिन्यापूर्वीच तिकीट काढले होते आणि मी त्यासाठीच गेलो होतो. असं देखील अजित पवार म्हणाले.
काय सांगता! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार