अजित पवार हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. सध्या राजकीय वातावरणात बऱ्याच उलाढाली घडत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरमध्ये दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचं आयोजन केलं आहे. या दौऱ्यादरम्यान नागपुरात पत्रकार परिषद घेतली गेली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेमकं कुठं कमी पडलं? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं मत मांडलं आहे. या शिबिराच्या निमित्ताने अजित पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात कुठे कमी पडला यावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. अजित पवारांनी त्यांचं मत अगदी परखडपणे आणि बिनधास्तपणे मांडलं. अजित पवारांनी त्यांच्या याच बोलण्याच्या शैलीतून भर पत्रकार परिषदेत कॅमेरासमोर आपण विदर्भात खरंच कमी पडलो अशी कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी नकळतपणे सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली.
सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार ‘सेक्स चॅम्पियनशिप’
“विदर्भ सोडला तर पश्चिम महाराष्ट्रासहित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये आम्ही निवडून येतो. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जागांवरती आम्ही निवडून येतो. विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जास्त जागांवरती विजय मिळवता येत नाही. पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी जास्त जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. तर, मग आम्ही इथल्या जागा निवडणुकीसाठी मागू शकतो”, असं अजित पवार म्हंटले आहेत. “या आधी देखील खोट्या बातम्या पसरवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भामध्ये अन्याय करण्याचा प्रयत्न करतो अशी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. खरं सांगायचं तर, जयंत पाटील अर्थमंत्री असताना आणि मी जलसंपदा विभागाचा मंत्री असताना जास्तीत जास्त विदर्भातील अनुशेष निघावा म्हणून मी अतिशय मनापासून काम केलं. तरीपण आमच्यावर हे असे आरोप झाले”. असे देखील अजित पवार म्हणाले.
ओडिशा ट्रेन अपघातामुळे मृत्यूचे तांडव, ट्रेनचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
“आम्हाला आणि आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हे सर्व प्रयत्न झाले होते. आमच्यावर केसेस नोंदवल्या गेल्या, चौकशा झाल्या ही खरी वस्तुस्थिती आहे. जाणीवपूर्वक कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हे न्यायाला धरून नाही. शेवटी कामं मात्र झालीच पाहिजेत काम होत असताना ती प्रामाणिकपणे झाली पाहिजेत. निर्णय हे पटपट घेतले पाहिजेत. पटपट निर्णय घेतले तरी यांना एवढी घाई का झाली? आणि उशीर झाला तर मग कुणाची वाट बघताय? अशा प्रकारचे जाणीवपूर्वक आरोप प्रत्यारोप आमच्यावर केले गेले. या सर्व गोष्टी आम्ही गेले कित्येक वर्षात अनुभवलेल्या आहेत”. कसे देखील अजित पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले.
ओडिशा ट्रेन अपघातामुळे मृत्यूचे तांडव, ट्रेनचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…