पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते? कोणत्या गणपतीचा काय आहे विशेष? जाणून घ्या माहिती!

Which are the five Ganeshas of Pune? What is special about which Ganpati? Know the information!

पुणे : विद्येचे माहेरघर असलेले पुणे विद्येचे दैवत असलेल्या गणपतीच्या उत्सवासाठी देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून गणपती उत्सवालाही याच शहरातून सुरुवात झाली. टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात करायच्या आधी, पुण्यात काही ठिकाणी गणपती उत्सव केल्या जात होता. त्यातलीच काही गणपती पुढे मानाचे गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. पुण्यातील या पहिल्या पाच मानाच्या गणपतींना विशेष स्थान आहे. जाणून घेऊयात कोणते आहेत हे मानाचे गणपती ? आणि त्यांचे आहे काय विशेष?

पुण्यातील मानाचा पहिला गणपती – “कसबा गणपती”

कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका सांगितली जाते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत.

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती – “तांबडी जोगेश्वरी”

तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता असल्यानं तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. श्री बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विशेष म्हणजे इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात.

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती – “गुरुजी तालिम गणपती”

लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. त्यामुळे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती समजल्या जातो. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही.

पुण्यातील मानाचा चौथा गणपती – “तुळशीबाग गणपती”

आपल्या उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जाणारा तुळशीबागेतला गणपती हा पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे. दक्षित तुळशीवाले यांनी 1900 मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची आहे . तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती – ” केसरी वाड्यातला गणपती”

पुण्यातला पाचवा मानाचा गणपती हा केसरी गणपती होय. लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत.१९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरुन जाते. मात्र, केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणूक केळकर रस्त्यावरुन जाते. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *