“…ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत

"...Which earthquake should this be? Rohit Pawar's tweet in discussion

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे. सध्या रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पायात घालायला नाहीत शूज! अन् 15 वर्षांची मुलगी सुर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये मारते सिक्स

त्यांनी ट्विट करत लिहिले की, “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या” असं त्यांनी ट्विट करत लिहिले आहे.

चक्क 61 वर्षे न झोपलेल्या माणसाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

त्याचबरोबर पुढे त्यांनी लिहिले की, “या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?” असं रोहित पवार यांनी लिहिले आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकजण यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एलोन मस्क यांचे ट्विट चर्चेत; कुत्र्याचे फोटो टाकत माजी सीईओंना डिवचले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *