Site icon e लोकहित | Marathi News

एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे

While doing FD, wait a bit! There are also major downsides to 'these' financial investments

सध्याच्या काळात आर्थिक सुरक्षिततेला विशेष महत्त्व आहे. भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येकजण उपाययोजना करून ठेवत असतो. दरम्यान आर्थिक गुंतवणुकीसाठी एफडी (Fixed Deposit) हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. एफडीमध्ये बँकेत पैसे सुरक्षित राहतात आणि वरून निश्चित परतावा सुद्धा मिळतो. मात्र एफडी करण्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेसुद्धा आहेत.

पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंह कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “माझ्याकडे अजित पवार…”

1) कमी परतावा मिळणे

एफडीच्या गुंतवणूकितील सर्वात मोठा तोटा म्हणजे अगदी कमी परतावा मिळणे. सर्व खाजगी आणि सरकारी बँका सध्या त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवत आहेत. परंतु, ही वाढ असून सुद्धा इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत एफडी वरील परतावा खूपच कमी असल्याचे पहायला मिळते. यावर उपाय म्हणून तुम्ही कॉर्पोरेट एफडी, बाँड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता.

ठाकरे गटाला दिलासा नाहीच! तातडीनं सुनावणीस करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

2) लिक्विडिटीची समस्या

आर्थिक गरज केव्हा भासेल सांगता येत नाही. मात्र एफडी मधून गरजेच्या वेळी चटकन पैसे मिळत नाहीत. हा एफडीचा दुसरा तोटा आहे. बँकेत एफडी केली की लगेचच मॅच्युरिटीची वेळही निश्चित होते. यामुळे कितीही गरज असली तरी, मॅच्युरिटीच्या वेळेपूर्वी पैसे काढता येत नाहीत. तसे केल्यास वेगळे शुक्ल आकारण्यात येते.

व्हॉट्सअ‍ॅपने आणले भन्नाट फिचर! नंबरच एकच मात्र चालवता येणार दोन WhatsApp

3) मर्यादित कर लाभ

एफडी मध्ये कर लाभ दिला जात नाही. काही ठराविकच एफडी आहेत ज्यांना कर लाभ मिळतो. पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या FD वर कराचा लाभ दिला जातो, मात्र जर यातसुद्धा मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळाली तर काही रक्कम TDS म्हणून भरावी लागते. याउलट आपण बॉण्ड किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यामध्ये पैसे गुंतवून कराचा लाभ घेऊ शकतो.

ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! नाव आणि चिन्हानंतर आता कार्यालयही…

Spread the love
Exit mobile version