हिवाळ्यात साताऱ्यात ट्रिप प्लॅन करताय, तर ‘ही’ ठिकाणे विसरू नकाच!

While planning a trip to Satara in winter, don't forget these places!

सातारा: पर्यटन करण्यासाठी बहुतेक लोक हिवाळ्याला प्राधान्य देतात. महाराष्ट्रात भरपूर प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. पण त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ( Mahableshwar) हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे. मात्र थंडीच्या दिवसांत महाबळेश्वरशिवाय सातारा जिल्ह्यात आणखी काही ठिकानांना तुम्ही भेट देऊ शकता. मराठ्यांची राजधानी म्हणून सर्वत्र साताऱ्याची ओळख आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे सातारा पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

भेटायला नकार दिला म्हणून तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल; इंस्टाग्राम ओळख पडली महागात

साताऱ्यातील भांभवली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. 1840 फूट उंच असणाऱ्या या धबधब्याचा उगम उरमोडी नदीतून होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो व त्याला तीन पायऱ्या आहेत. जगप्रसिद्ध कास पठारापासून फक्त 5 किलोमीटर दूर हा धबधबा आहे. या ठिकणी प्रचंड शांतता अनुभवायला मिळते. कोणताही गाईड, फेरीवाले व कॅमेरामन हे येथे नसतात.

टीसी कॉलेजमधील मीडिया डिपार्टमेंटकडून महिला सशक्तीकरणावर कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा पुढाकार

याशिवाय ऐतिहासिक वारसा असणाऱ्या साताऱ्यात आणखी बरीच पर्यटन ठिकाणे आहेत. अजिंक्यतारा, सज्जनगड, वासोटा यांसारखे किल्ले येथे आहेत. तसेच ठोसेघर धबधबा देखील विशेष प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसांत कास पठारावर ( Kaas Pathar) अतिशय दुर्मिळ अशी फुले येतात. हा फुलांचा बहर पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक दरवर्षी साताऱ्यात येतात. तसेच बामणोली येथे देखील पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे.

ब्रेकिंग! अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार? जामिनावर स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआय कडून मागणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *