Site icon e लोकहित | Marathi News

Roof collapsed । झोपेत असताना काळाचा घाला, छत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

While sleeping, 5 members of the same family died due to roof collapse

Roof collapsed । उत्तरप्रदेशच्या (UP) लखनौमधील मवैया भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री गाढ झोपेत असताना एका कुटुंबावर काळाने घात केला आहे. यामध्ये घराचे छत कोसळून (Lucknow roof collapsed) एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. (Latest Marathi News)

Anantnag encounter । वाचवा, वाचवा.. ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव करताच अतिरेक्यांनी जीवमुठीत घेऊन काढला पळ

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ शहरात आलमबाग रेल्वे कॉलनीतील शनिवारी सकाळी एका जुन्या घराचे छत कोसळले. घरातील सर्व लोक गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे या लोकांना आपला जीव वाचवता आला नाही. या दुर्दैवी घटनेत पाच जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये पती- पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Asia Cup 2023 । पावसामुळे फायनल होऊ शकली नाही तर ‘या’ संघाला मिळणार ट्रॉफी

या घटनेमुळे परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Politics News । बिग ब्रेकिंग! १६ आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर

Spread the love
Exit mobile version