संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची असे वक्तव्य बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बागेश्वर बाबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. यामध्येच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन विद्यार्थिनींनी मिळून केली ऐकिला बेदम मारहाण; पाहा व्हायरल VIDEO
बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
मोठी बातमी! दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजितदादा पवार यांनी यावेळी केली. pic.twitter.com/IFn6gcHdcq
— NCP (@NCPspeaks) January 31, 2023
नेमके कोण आहेत बागेश्वर बाबा?
बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) हे छतरपूर (Chhatrapur) जिल्ह्यातील आहेत. येथील बागेश्वर धाम हनुमान या मंदिराचे पुजारी व कथावाचक म्हणून त्यांना ओळखले जात होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shatri) हे त्यांचे मूळ नाव आहे. छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला असून त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. बागेश्वर बाबांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणासाठी बाबांना वृंदावन येथे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे एक हजार रुपये न्हवते. म्हणून बागेश्वर बाबांनी शिक्षण सोडून वडिलांसोबत कथा वाचण्यास सुरुवात केली.