पदवीधर निवडणूका पार पडून त्याचे निकाल देखील नुकतेच जाहीर झाले. मात्र या निवडणुकांचे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहेत. दरम्यान तांबे आणि काँग्रेस यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेच आहेत. परंतु, बाकी पक्षात देखील टीकासत्र सुरू आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde) यांनी पत्रकार परिषदेत एकाचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे.
‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत
सत्यजित तांबेनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या भूमिकेनंतर राम शिंदेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाला सोडले नाही. काँग्रेस पक्षाने त्यांना सोडले आहे. तसेच सत्यजित तांबेंनी ( Satyajeet Tambe) काँग्रेसच्या नियोजन व विचारधारेची लक्तरे वेशीला टांगली आहेत. मात्र, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी निवडणूक झाल्याबरोबर लगेच हा विषय मांडला त्यावरून त्यांच्या मनाला किती त्रास झाला असेल हे स्पष्ट होत आहे.’ असे राम शिंदे म्हणाले आहेत.
जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदीच एक नंबर, जो बायडन आणि ऋषी सूनक यांनाही टाकले मागे
यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. मात्र त्यांनी आता तरी बालिशपणा सोडला पाहिजे. आपण आव्हान कोणाला देतोय? या देशात आणि या राज्यात जे इतर कोणीही घडवू शकले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी घडवले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आपले बालिश विचार मांडण्याचे थांबवावे, शेवटी आपण बालिश असला तरी माजी मंत्री आहात, अशी बोचरी टीका राम शिंदे यांनी केली आहे.
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे’ म्हणत तरुणाने दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्येच घातला राडा
याशिवाय राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांना टोला लागवत राम शिंदे म्हणाले की, ” अजित पवार सांगतात की एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहेत. हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले, मात्र अजित पवार बंडखोरी करणार आहेत, हे अजित पवारांनी कोणाला सांगितलं ? अजित पवार यांनी सुद्धा सुरुवातीला भाजपला बिलगायचे काम केले, मात्र ते अयशस्वी ठरले. परंतु, एकनाथ शिंदे यांनी योग्य चाल केली आणि ते यशस्वी झाले.
मोठी बातमी! अदानींची शेअर मार्केट मधून हाकलपट्टी; वाढते नुकसान पाहून NSE ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय