सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण असं की, शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बजेटवर प्रतिक्रिया देतात. त्याचवेळी उद्धव ठाकरे बजेटवर बोलत असताना अजित पवार कुणाला तरी डोळा मारताना दिसतायेत.
त्यामुळे सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांनी नेमका कुणाला डोळा मारला याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
शेतकऱ्याची थट्टा! वांग्याला प्रति किलो मिळाला फक्त 27 पैसे दर
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्षाने या बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीतील बरेच नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
जेलमध्ये असलेल्या आदिलने केला राखी सावंतला फोन, म्हणाला, “मला एक संधी…”