
बागेश्वर बाबा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. दिव्यदृष्टीने आपण पाहिजे त्या गोष्टी ओळखतो असा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी या बाबांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. चमत्कार करून दाखवला तर बाबांसाठी 30 लाखांचे बक्षीस देखील श्याम मानव यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनी देखील हे आव्हान स्वीकारले आहे. यामुळे अचानकच चर्चेत आलेले हे बाबा कोण ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सेल्फी घेण्यासाठी चढला ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये अन् घडलं भलतंच; वाचून व्हाल थक्क
बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) हे छतरपूर (Chhatrapur) जिल्ह्यातील आहेत. येथील बागेश्वर धाम हनुमान या मंदिराचे पुजारी व कथावाचक म्हणून त्यांना ओळखले जात होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shatri) हे त्यांचे मूळ नाव आहे. छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला असून त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. बागेश्वर बाबांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणासाठी बाबांना वृंदावन येथे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे एक हजार रुपये न्हवते. म्हणून बागेश्वर बाबांनी शिक्षण सोडून वडिलांसोबत कथा वाचण्यास सुरुवात केली.
ब्रेकिंग! महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपेडट समोर!
बागेश्वर बाबांच्या गावात एक हनुमान मंदिर असून या मंदिरात त्यांच्या आजोबांची समाधी आहे. त्यांचे आजोबा सिद्धपुरुष होते. असे मानले जाते. यामुळेच बागेश्वर बाबा याना भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली आहे. बागेश्वर बाबांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे नाव, पत्ता व त्याची सगळी माहिती न सांगताच प्राप्त होते. असा दावा त्यांच्या भक्तांकडून केला जात आहे.