
बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये (Big Boss 16 ) रॅपर एमसी स्टॅनची चांगलीच चर्चा होती. परंतु, शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी यांपैकी कोणीतरी बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकवणार असे म्हंटले जात होते. मात्र रॅपर एमसी स्टॅनने या सीझनचे विजेतेपद पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यांनतर सातत्याने त्याचीच चर्चा सुरू आहे.
आईच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का; कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची प्रकृती गंभीर
नुकतंच एमसी स्टॅनने एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. एमसी स्टॅन ‘बिग बॉस’च्या घरामध्ये गर्लफ्रेंड बूबाबाबत बऱ्याचवेळा बोलताना दिसला. आता तर त्याने त्याच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
एमसी स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
एमसी स्टॅन म्हणाला, “मागच्या चार ते पाच वर्षांपासून आमचं रिलेशन आहे त्यामुळे या एक ते दीड वर्षामध्ये मला बूबाबरोबर लग्न करायचं असल्याचं एमसी स्टॅन म्हणाला आहे. त्याचबरोबर तो म्हणाला मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती खूप गोड मुलगी आहे. मुलगी कशीही दिसूद्या ती हुशार असली पाहिजे. त्यामुळे मी खूप लकी आहे की, ती माझ्या आयुष्यामध्ये आहे”. असं एमसी स्टॅन म्हणाला आहे.
हाताच्या कोपऱ्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याचे जालीम उपाय; वाचा सविस्तर
जाणून घ्या गर्लफ्रेंड बूबा नेमकी कोण आहे?
स्टॅनच्या गर्लफ्रेंडच खार नाव अनम शेख असून स्टॅन तिला ‘बूबा’ या नावाने हाक मारतो. ती २४ वर्षाची आहे. बूबा ही स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. याआधी तो दुसऱ्या एका मुलीसोबत रिलेशनमध्ये होता. औझमा शेख असं त्या मुळीच नाव होते. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर तिने स्टॅनवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे तो चांगला अडचणीत देखील सापडला होता.