मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असल्याचे आपल्याला दिसत आहे. तिच्या कार्यक्रमासाठी महिनाभर प्रतिक्षा करावी लागते तेव्हा कार्यक्रमाची तारीख मिळत आहे. यामध्येच आता गौतमी पाटीलचा नगर जिल्ह्यात झालेला एक कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
परिणीती चोप्राचं ठरलं! या व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ
गौतमीच्या कार्यक्रमणात तरुणांची गर्दी होणं किंवा तरुणांनी राडा कारण हे काही नवीन नाही. मात्र यावेळी नगरमध्ये गौतमीचा कार्यक्रम चालू असताना एका तरुणाने गौतमी सारखा हुबेहूब डान्स केल्याचं समोर आले. तरुणाने स्टेजसमोरच गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली आहे. गौतमीला टक्कर देणाऱ्या या तरुणाचं नाव पवन चव्हाण असे आहे.
उर्फी जावेदचे ‘ते’ ट्विट चर्चेत; म्हणाली, ‘नग्न तर सगळेच आहेत पण…’
नेमका कोण आहे पवन चव्हाण?
पवन चव्हाण हा कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणचा रहिवासी आहे. हा १९ वर्षीय तरुण. घरची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे पवनने सातवीमध्ये शाळा सोडली आणि पानटपरी चालवू लागला. मात्र नृत्याची आवड असल्याने तो मागच्या तीन वर्षांपासून नृत्य शिकतोय. आणि आता गौतमी पाटील सारखे हुबेहूब नृत्य केल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे.