भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच पार पडला. राधिका मर्चेंट ( Radhika Marchent) या मुलीसोबत अनंतचा साखरपुडा पार पडला आहे. राजस्थान येथील आलिशान हॉटेल मध्ये पार पडलेल्या या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एवढ्या श्रीमंत घरात सून म्हणून जाणारी राधिका मर्चेंट नक्की कोण आहे ? हा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सवर माधुरी पवारची प्रतिक्रिया, म्हणाली, “तर कलाकाराच्या कलेचा आदर…”
राधिका ही भारतामधील प्रमुख व प्रसिद्ध औषध कंपनी एनकोर हेल्थ केअर चे सीईओ उद्योगपती वीरेन मर्चेंट व शैला मर्चेंट यांची मुलगी आहे. विशेष गोष्ट म्हणजे राधिका व अनंत हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. 18 डिसेंबर 1994 रोजी राधिकाचा जन्म झाला असून ती क्लासिकल डान्सर आहे. जवळजवळ आठ वर्षे तिने भरतनाट्यमचचे शिक्षण घेतले आहे. मुंबईच्या श्री निभा आर्ट अकादमीत गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.
‘या’ कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू
यावर्षी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली छोटी सूनबाई राधिका मर्चेंटसाठी खास अरंगेत्रम सेरेमनी देखील आयोजित केली होती. राधिका फक्त नृत्य करत नसून ती फॅमिली बिझनेस मध्ये देखील आहे. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमानी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये पूर्ण केले आहे. यानंतर 2017 साली न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या पॉलिटिकल सायन्स विषयात ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली आहे. इतकंच नाही तर शिक्षण संपल्यानंतर इंडिया फर्स्ट ऑर्गनायजेशन आणि देसाई अँड दीवानजी सारख्या फर्ममध्ये इंटर्नशिप देखील केली आहे. सध्या तिने फॅमिली बिझनेस जॉईन केला असून त्यामध्ये ती काम करते.
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार; म्हणाले, “अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि…”