धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं? फैसला पडला लांबणीवर

Who exactly is the bow and arrow symbol? The decision was delayed

मुंबई : धनुष्यबाण चिन्ह नेमक शिवसेनेचं (shivsena) की शिंदे गटाच? याबाबतचा फैसला लांबणीवर पडला आहे. दरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) धनुष्यबाणाचा (Dhanushy ban) निर्णय होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी एक वाजता शिवसेनेचे नेते निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करणार आहेत. त्यासाठी अनिल देसाई (Anil Desai) नवी दिल्लीत दाखल झाले. पुरावे सादर केल्यानंतर धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणीची (hearing) पुढची तारीख ठरणार आहे.

प्रियकरासाठी चक्क मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्त्या

केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याची मुदत आयोगाने दिली होती. आज ही मुदत संपणार आहे. दरम्यान धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरात लवकर घेतला जावा, अशी मागणी शिंदे गटाकडून (Shinde group) निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.

Varun Dhawan: वरुण धवनने ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची केली घोषणा केली, सारा अली खानची अशी केली नक्कल

यावेळी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी “आम्ही मूळ शिवसेना आहोत आणि आम्ही आमची बाजू मांडणार,” असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आमदार व खासदार म्हणजे मूळ पक्ष होत नाही, असंही देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन मुंबई’ची तयारी सुरु केली आहे. दरम्यान यासंदर्भात शिंदे गटातील मंत्र्यांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी लवकरच बैठकही होणार आहे.

Cotton: दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाला मिळाला अकरा हजारांचा भाव, पहिल्याच दिवशी समाधानाचे वातावरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *