महाराष्ट्रातील दंगलींमागे नेमकं कोण? फडणवीस म्हणाले, “100 टक्के हे…”

Who is behind the riots in Maharashtra? Fadnavis said, "100 percent this..."

अकोला (Akola) येथे सोशल मीडियावर एका वादग्रस्त पोस्टमुळे अकोल्यातील जुन्या शहर भागात दोन गटात मोठा राडा झाला. याठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा काल रात्री अहमदनगरच्या शेवगाव शहरात रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक झाली.

तरुणामुळे वाचले पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण; वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने टळला अनर्थ…व्हिडीओ पाहून बसेल धक्का

या घटनांमुळे महाराष्ट्रात कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. यामध्येच आता महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही. आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील त्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. असा गंभीर इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ब्रेकिंग! पुण्यात खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ मुलींना वाचविण्यात यश तर २ मुली बेपत्ता

“या सर्व घटना 100 टक्के हे जाणुनबुजून होत आहे. जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण जे कोणी असा गैरप्रकार करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Cabinate Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! ‘या’ मोठ्या नेत्याने केला खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *