Maratha Reservation । जालना : मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. चार वर्षांपासून थंडावलेले आंदोलन पुन्हा चिघळले आहे. जालना येथील झालेल्या लाठीहल्ल्यानंतर (Jalna Protest) सरकारविरोधात मराठा समाजात संतापाची भावना वाढली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे नाव चर्चेत आले आहे. याला कारणही तसेच आहे. (Latest Marathi News)
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार कुकडीचे आवर्तन
कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या मातोरीचे आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरामध्ये राहत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी फारशी चांगली नाही. एकेकाळी त्यांच्याकडे उपजिविकेसाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. मागील १० ते १५ वर्षापासून ते मराठा समाजाला आरक्षण (Maratha community reservation) मिळावे यासाठी काम करत आहेत. आता त्यांनी स्वत:ची जमीन विकली आहे. (Who is Manoj Jarange Patil)
शिवबा संघटनेची स्थापना
त्यांनी आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको आंदोलनदेखील केले. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात देखील काम केले आहे. परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असे मनोज त्यांचे कुटुंब आहे.
Maratha Reservation । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
त्यांनी मागील २९ ऑगस्टपासून आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. परंतु सुरुवातीला तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष वेधले नाही. १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. त्यावेळी प्रचंड गोंधळ झाल्याने राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. आजही ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर ठाम आहेत.
Pune Accident News । भीषण अपघात! टेम्पो-कारची समोरासमोर धडक; ३ जण जागीच ठार