ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप केला. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं आहे. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सपना गिलने केले पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला…”
याप्रकरणावर संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राज ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिदे यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया राजा ठाकूर यांनी दिली आहे. मात्र आता राऊतांच्या या आरोपानंतर ठाण्यातील गुंड राजा ठाकूर नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे.
“तोपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत…”, एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम
राजा ठाकूर नेमका कोण आहे?
राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याने अनेक हत्या केल्या आहेत. या हत्येप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्यावर जानेवारी 2011 मध्ये कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील यांची हत्या करण्यात आली होती. याचा आरोपी देखील ठाकूरच होता. त्यामुळे या प्रकरणामुळे राजा ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर 2019 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली.
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करा; आदित्य ठाकरेंचे चिंचवड मध्ये आवाहन