
Sharad Mohol । काल पुणे (Pune) शहरामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. कारण पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळचा खून गोळ्या झाडून त्याचा खून (Sharad Mohol Murder) करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. (Latest marathi news)
माहितीनुसार, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळ टोळीचे वर्चस्व असून याचा फायदा भाजपला निवडणुकीमध्ये होणार होता. मात्र गुंडाला भाजपमध्ये घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. मात्र निवडणुकाआधीच शरद मोहोळ याचा नेमका गेम कोणी केला? हा खून टोळी युद्धातून झाला की दुसऱ्या व्यक्तीने केला. याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. (Sharad Mohol Case Update)
WTC 2025 । भारतीय संघाला मोठा झटका! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल
दरम्यान, शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला पिंटू मारणे हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि त्याने दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केले होते. त्यामुळे याप्रकरणी त्याला पुन्हा पोलिसांनी अटक केली.
Crime News । संतापजनक! बायको माहेरी जाताच बापाने केली ३ वर्षांच्या चिमुरड्याची विक्री
इतकेच नाही तर शरद मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असणाऱ्या कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणी शरद मोहोळला जामीन मिळाला. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य थांबली नाहीत. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार देखील केले होते.
Sharad Mohol । शरद मोहोळ याचे भाजपशी कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर