
Baramati Gram Panchayat Election । संपूर्ण राज्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. पुण्यातील एकूण 231 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 157 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. यंदाची लढत झालेल्या सत्ताबदलामुळे चर्चेत आली होती. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) गेल्याने बारामतीत सत्ता कुणाची येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Latest Marathi News)
बारामती पवारसाहेबांची की अजितदादांची असेल? असा सवाल बारामतीकरांसह संपूर्ण राज्याला पडला होता. बारामती तालुक्यातील 31 पैकी 26 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यात 24 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. दोन ग्रामपंचायतीत भाजपने खाते उघडले आहे.
Accident News । लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! नवरदेवासह चारजण जागीच ठार
या ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता
बारामतीत आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायंबाचीवाडी, वंजारवाडी, करंजे पूल, कोऱ्हाळे खुर्द, शिर्सुफळ, मेडदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.