CSK Captaincy । मे महिन्यांत आयपीएलच्या (IPL) १६ वा हंगामाचा शेवट झाला. या हंगामात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चॅम्पियन ठरली. चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर गुजरात संघाला पराभव पत्करावा लागला. परंतु आयपीएलचा १६ वा हंगाम सुरु असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा हा शेवटचा सामना असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे चेन्नईचा पुढचा कर्णधार असा सवाल अनेकांना पडला आहे. (Latest Marathi News)
ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केल्या तीन धडाकेबाज घोषणा; वाचा एका क्लिकवर
याबाबत आता अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने एक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विधान केले आहे. रायडूच्या मतानुसार, आगामी काळात संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे (Rituraj Gaikwad) कॅप्टन होण्याची संधी आहे. तो पुढील 10 वर्षांपर्यंत चेन्नईचे कर्णधारपद सांभाळू शकतो, असा दावा रायुडूने केला आहे. दरम्यान, १६ व्या हंगामात ऋतुराज चांगल्या फॉर्ममध्ये होता.
संघाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा असून त्याने या हंगामात 590 धावा केल्या. कर्णधारपदासाठी असणारे सर्व गुण त्याच्याकडे आहेत. त्यामुळे धोनीनंतर पुढील हंगामासाठी कर्णधार होऊ शकतो. परंतु यावर अजूनही महेंद्रसिंह धोनी आणि ऋतुराज गायकवाडने प्रतिक्रिया दिली नाही.
Harshvardhan Jadhav । आत्ताची सर्वात मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका