Site icon e लोकहित | Marathi News

Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले; “साधारण लोकांना…”

Sharad Pawar

Sharad Pawar । जुन्नर : राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

Accident । सर्वात मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने दोघांना चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू तर तिचा पती गंभीर जखमी

काल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष (NCP National President) आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आतापर्यंत शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे अजित पवार गटाकडून सांगण्यात येत होते. परंतु अचानक या गटाने आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Pomegranate Price । एका दिवसातच शेतकरी मालामाल! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर

यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “सर्वसामान्य लोकांच्या स्वच्छ कल्पना असून ते काय काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. काल किल्लारीत 20 हजार लोक जमले होते. महाराष्ट्रात कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे साधारण लोकांना माहीत आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Tomato Rate । टोमॅटोचे भाव कोसळले! पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून संतप्त शेतकऱ्याने रोखला रस्ता

Spread the love
Exit mobile version