
मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेदने एका इंटरव्यू मध्ये सांगितलं, ती पाच वर्षांपूर्वी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती, जर ती त्याच रिलेशनशिपमध्ये अजूनही असती तर ती आत्ताची उर्फी जावेद नसती, सध्या तरी मी सिंगल आहे असं तिने सांगितलं, आणि आत्ता जर मी पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये आले तर माझ्या लग्नाच्या दिवशी डायरेक्ट समजेल कोण आहे तो.
Bharti Singh: मोठी बातमी! भारती सिंह ‘द कपिल शर्मा शो सोडणार, कारण…
उर्फी जावेद सोशल मीडिया वरती खूप ऍक्टिव्ह असते, ती तिच्या अतरंगी हेअर स्टाईल आणि कपड्यांच्या फॅशन मुळे नेहमी ट्रेनिंग मध्ये असते, आता पुन्हा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नाही तर पारस सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. एका इंटरव्यू मध्ये उर्फी जावेदन अफेअर आणि लग्नाच्या प्लॅन्सच्या बाबतीत खूप काही सांगितलं.
Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” किरीट सोमय्यांचे सूचक विधान
उर्फी जावेद रिलेशनशिपमध्ये आहे
इंटरव्यू मध्ये तर उर्फीने सांगितलं की ती सध्या सिंगल आहे. आता तिला वाटतं मी परत कधी रिलेशनशिप मध्ये येऊ शकत नाही, उर्फी जावेद बोलली मी कधी कोणत्या मुलाबरोबर दिसली, मी कधी दिसणार ही नाही, आणि मला असं वाटतं मी जोपर्यंत लग्न करणार नाही तोपर्यंत मी माझ्या रिलेशनशिपला पब्लिकली सांगणार नाही. उर्फिला असं वाटतं की मी जेवढी निगेटिव्हिटी सहन करते तेवढी माझा पार्टनर सहन करू शकणार नाही, मी तर काय सहनच करते, माझ्यामध्ये खूप हिम्मत आहे. माझ्यामुळे त्याला खूप सहन करावे लागेल, मी जे करते त्याचा प्रभाव त्यावर नको पडायला .