Loksabha Election 2024 । पुणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आतापासूनच जय्यत तयारी सुरु आहे. आधी शिवसेना (Shivsena) नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटल्याने या निवडणुका यावर्षी अटीतटीच्या होणार आहेत. सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. अशातच पक्षफुटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)
Ganesh Festival । काय सांगता? गणेश मूर्तीच्या डोळ्यात अश्रू, भाविकांची प्रचंड गर्दी
दरवर्षी या मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना संधी दिली जाते. परंतु यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात येणार अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “येत्या निवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळेल,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
“आगामी निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठून कोण लढवणार आहे, ते ठरवू. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का? कोणीही पोस्टर लावू शकतं. समर्थक कुणाला कुठंही नेऊन बसवतात. आदरणीय पवारसाहेबांकडे मुख्यमंत्री व्हावं असे अनेक नेते आहेत,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
Ajit Pawar । शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवार म्हणाले, “मला त्याबद्दल..”