अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट (NCP Crisis) पडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांना कोणत्या पक्षात जावे, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शिंदे- फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीने (NCP) प्रवेश केल्याने या सरकारमधील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)
“महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना अजित पवारांचे विचार आणि धोरण वेगळे होते. परंतु त्यांची सध्याचे विचार आणि धोरण वेगळे असून आता ते शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारचा एक भाग आहेत. अजित पवार हे चालणारे नाणे आहेत. आमच्या गटातील प्रत्येकजण मंत्री आहेत. त्यामुळे आमच्यात कोणत्याही प्रकाराची नाराजी नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या वाट्याला जे काही मिळेल ते मिळेल”, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी
राष्ट्रवादीचे चिन्ह अजित पवार की शरद पवार (Sharad Pawar) यांना मिळणार? यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “आगामी काळात राष्ट्रवादीचे चिन्ह अजित पवार यांना मिळू शकते,” असा दावा देसाई यांनी केला आहे. देसाई यांच्या दाव्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
Rakhi Sawant । राखी सावंतने भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क