बारामती मधील कृषीक प्रदर्शन ( Krushik 2023) अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्यातील शेतकरी, व्यवसायिक व विद्यार्थी या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत असतात. दरम्यान, आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरवात होणार आहे. आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आता अब्दुल स्तरांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आताची सर्वात मोठी बातमी! राखी सावंतला अटक
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जे कोणीही बारामतीमध्ये येत आहेत त्यांचे स्वागत आहे. कारण आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत त्यामुळे जे बारामतीमध्ये येतात त्यांचे स्वागत आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
२३ जानेवारी २०२३ ला येतंय बाळासाहेब ठाकरेंबद्दल नाटक
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तरच्या या दौऱ्याकडे बारकाईने पाहिले जात आहे. आज अब्दुल सत्तर बारामती दौऱ्यावर असून कृषी प्रदर्शनाला भेट देणार आहेत.
पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; अपघातात श्रीगोंद्यातील ६ जण गंभीर जखमी