शिवसेना पक्ष कुणाचा? आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू आहेत. मागील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटातील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाला द्यायचा याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे. दरम्यान उद्या यावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!
शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: सांगितले होते की, “आता माझ्यानंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे पूर्णपणे सांभाळतील. यासाठी तुम्हीच त्यांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा. तसेच युवा म्हणून आदित्य ठाकरे देखील जबाबदारी घेतील.” याची नोंद शिवसैनिकांनी घ्यायला हवी. असे अजित पवार म्हणाले आहेत.
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
शिवसेनेसोबत (Shivsena) बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राष्ट्रीय कार्यकारिणी मधील पदाधिकारी, आमदार, खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आयोग व सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.