शिवसेना पक्ष कुणाचा? आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू आहेत. मागील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटातील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाला द्यायचा याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे.
चार हजार तलाठी भरती संदर्भात समोर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर
निवडणूक आयोगामध्ये आज शिंदे आणि ठाकरे गटाकडून लेखी स्वरूपामध्ये काय काय मुद्दे मांडले जाणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगामध्ये आज यावर प्रत्यक्ष सुनावणी होणार नसली तरी युक्तिवाद लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर काही दिवसातच निवडणूक आयोग चिन्हबाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो.
गौतमीच मार्केट जाम केलं संध्याने! पाहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राष्ट्रीय कार्यकारिणी मधील पदाधिकारी, आमदार, खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आयोग व सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने आधी घरी व्हिडीओ कॉल केला नंतर आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या झाडल्या