
Devendra Fadnavis । मुंबई : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी कडवी टीका केली होती. महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. याचे तीव्र पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळत आहेत. (Latest marathi news)
अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणी आता एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व माहिती समोर येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसचा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
“रात्री जाऊन जरांगे पाटलांना परत आणणारे कोण आहेत? कोणाकडे बैठक झाली? हे आरोपी सांगत आहेत. आम्हाला दगडफेक करा, असे आरोपीने जबाबात सांगितले आहे. ज्या पोलिसांवर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाईल,” असे फडणवीस म्हणाले आहेत.