Ajit Pawar । राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “निवडणूक आयोग…”

Whose nationalist? Ajit Pawar spoke clearly, said; "Election Commission..."

Ajit Pawar । पुणे : शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latets Marathi News)

Tomato Subsidy । टोमॅटोला अनुदान जाहीर करा! शेतकऱ्यांची मोठी मागणी

याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संवाद साधला. “निवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो निर्णय मला मान्य असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जेव्हा मुंबईत आले तेव्हा मी बारामतीत होतो. त्याबाबत मी अमित शहा यांच्या कार्यालयाला संपर्क साधून कल्पना दिली होती,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Mobile Addiction । धक्कादायक! शहरातील 61 टक्के लहान मुलांना लागलंय मोबाइलचं व्यसन

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे प्रमुख होऊन 14 महिने झाले आहेत. प्रत्येक यंत्रणा त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडत असते, या बातम्यामध्ये काही तथ्य नाही असे माझं स्पष्ट मत आहे. जोपर्यंत कुठला निकाल येत नाही तोपर्यंत हे असं झालं तर तसं झालं तर काय होईल, असा असला विचार पण मी करत नाही. मी केवळ विकासाचा विचार करतो,” असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Gautami Patil । सांभाळ केला नाही तरीही गौतमी यशाचं श्रेय वडिलांना का देते? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

Spread the love