
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर काल महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. शिवसेना प्रमुख कोण? आणि शिवसेना भवन कोणाचे? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
‘या’ नावाने उद्धव ठाकरेंनी पक्ष काढावा, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिला सल्ला
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. आणि तेच आमचे सेनापती आहेत. अस संजय राऊत स्पष्टच म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
त्याचबरोबरच शिवसेनाच्या शाखा, शिवसेना भवन इथं जे शिवसेनेचं नाव आहे ते तसंच राहणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. आता यावर उत्तर देत ते म्हणाले, “आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाहीत. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि शिवसेनेची शाखा म्हणूनचं काम करतील. त्यामुळं शिवसेना भवनाचं काहीही होणार नाही. त्याचबरोबरच शिवसैनिक देखील आमच्यासोबत राहतील असं यावेळी राऊत म्हणाले आहेत.