
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केलेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यामध्ये विभागली गेली. तेव्हापासून शिवसेना नक्की कुणाची यावर वाद सुरू आहेत. तसेच धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार हे सुद्धा अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा बाबतची कायदेशीर सुनावणी फेब्रुवारी मध्ये होणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेना पक्ष व धनुष्यबाण कुणाचा यावर सुनावणी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट
उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे येत्या 13 जानेवारी पर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख असणार आहेत. त्यानंतर त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपतोय. मात्र सत्ता संघर्षाचा कायदेशीर पेच संपेपर्यंत उद्धव ठाकरे यांना मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सुनावणी होणार आहे.
करोडपती शेतकऱ्यांच्या ‘या’ गावाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क! फक्त एका पिकामुळे पालटले गावचे रूप
या दरम्यान निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर वेगळीच शक्यता निर्माण होत आहे. परिणामतः शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे या मागणीवर निर्णय देताना निवडणूक आयोग एकतर उद्धव ठाकरेंना मुदतवाढ देईल किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय घेतला जाईल. यामुळे आजचा दिवस निर्णयाक ठरणार आहे.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती? आमदार खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत