का अपयशी ठरत आहेत भारतीय गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात? समोर आली कारणे..

Why are Indian bowlers failing to defend runs? The reasons came up..

मुंबई : भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात 6 बाद 208 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारूनही भारतीय गोलंदाज तिचा बचाव करू शकले नाहीत. महत्वाची बाब म्हणजे या नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचे हे अपयश स्पष्टपणे दिसून आले. याच कारण म्हणजे गोलंदाजांची निवड चुकत आहे, भुवनेश्वर कुमारचा अनुभव कुचकामी ठरतोय आणि फिरकीचा पर्याय शोधण्यातही अपयश येत आहे.

Uddhav Thackeray: “संघर्ष झाला किंवा रक्तपात झाला तर..”, शिंदे गटाला गंभीर इशारा देत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

नाणेफेकीचा कौल कोणाकडे आहे यावर सामन्यात कोण जिंकणार हे ठरत नाही तर मोक्याच्या वेळी तुमची फलंदाजी आणि गोलंदाजी कशी होते हे सर्वांत महत्त्वाचे असते. कर्णधार रोहित शर्माने मान्य केले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पुढील सामन्यापूर्वी गोलंदाजीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना गोलंदाजांच्या रचनेवर विचार व्हायलाच हवा. अन्यथा भारतापुढील आव्हाने कठीण होतील, यात शंका नाही अस रोहित शर्मा म्हणाला.

Uddhav Thackeray: आत्तापर्यंत मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर जहरी टीका

भुवनेश्वर कुमार अनुभवाचा फायदा उठवण्यात ठरतोय अपयशी

भुवनेश्वर लौकिकाला न्याय देऊ शकत नसल्याचा फटका गेल्या तीन सामन्यांत भारताला बसला आहे. त्यामुळेच विख्यात क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांनीही भुवनेश्वरबाबत चिंता व्यक्त करीत भारताला सावधतेचा इशारा दिला आहे. कारण टी-२० क्रिकेट सामना हा उत्तरार्धातील षटकांत निर्णायक ठरतो. त्यातही १९वे षटक हे महत्त्वाचे असते.कारण
त्या षटकात चांगली गोलंदाजी झाली, तर अखेरचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांवरील दडपण कमी होते. पण आशिया चषक स्पर्धेत अखेरच्या दोन सामन्यांत १९वे षटक भुवनेश्वरनेच टाकले. या दोन्ही षटकांत अनुक्रमे १६ आणि १४ धावा निघाल्या. हाच कित्ता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने गिरवला. तीन सामन्यांत १८ चेंडूंत त्याने ४९ धावा दिल्या.

Lumpy: देशात ‘लम्पीचा’ धुमाकूळ! जनावरांच्या मृत्यूचा आकडा वाढला, पशुपालकांनो अशी घ्या काळजी..

बुमराच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही शंका?

जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकले नाहीत. आता ते तंदुरुस्त झाले म्हणून त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण संघात स्थान मिळूनही बुमरा अंतिम ११ मध्ये कसा नाही? तो १०० टक्के तंदुरुस्त आहे, की नाही? असे प्रश्न टी-२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर असल्यामुळे उपस्थित राहतात तसेच हर्षलच्या तंदुरुस्तीनंतर पुनरागमन करताना त्याच्या गोलंदाजीत आत्मविश्वासाचा अभाव, तसेच त्याची अचूकता हरवलेली दिसून आली. म्हणून संघ निवड प्रक्रियेत काही तरी चुकते आहे. खेळाडू तंदुरुस्त नसतील, तर त्यांची निवड कशी होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

मोहम्मद शमीला डावलले जाते

टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात अनुभवी शमीला डावलण्यात आले. तो राखीव आहे. उसळणाऱ्या खेळपट्ट्यांवर शमीची भेदकता उपयुक्त ठरली असती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाकडून युवा गोलंदाजांवरच अधिक प्रयोग होताना दिसत आहेत. जसप्रित बुमरा, शमी, भुवनेश्वर, उमेश यादव, हर्षल, अर्शद खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर, अर्शदीप सिंग, असे वेगवान गोलंदाजीचे पर्याय भारताकडे असताना, यातून योग्य निवड होताना दिसून येत नाही.

ब्राईट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जु.कॉलेज खडकी ता.दौंडच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन आणि एमएच-सीईटी मध्ये यश संपादन!

अश्विनचा अनुभव निश्चित फायद्याचा ठरेलच..

रविचंद्रन अश्विन हा आतापर्यंत भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. परंतु महत्वाची बाब म्हणजे यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा हे पर्याय उपलब्ध झाल्यावर अश्विन काहीसा मागे पडला. अजूनही अश्विन टी-२० क्रिकेटमध्ये किफायतशीर असूनही सातत्याने चहलला मनगटी फिरकी गोलंदाज म्हणून पसंती मिळत आहे. खरतर अश्विनचा अनुभव निश्चित फायद्याचा ठरेलच पण तसेच तो उपयुक्त फलंदाजही आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना! ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *