
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास महिना होत आला तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याच विस्तारावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात होते पण ऑगष्ट महिना आला तरी अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तपास नाही. यावर आता मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कशाला घाबरत आहेत ? असा सवाल अजित पवारांनी (Ajit Pawar) केला.
शेतकरी आणि पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. सचिन म्हणतात, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर परिस्थिती टाकली पण ते लक्ष देत नाहीत. म्हणून राज्यपालांना भेटलो. आता जनतेनीच निरक्षण करावं कारभार कसा चालला आहे आणि याला जबाबदार कोणया आहे? असं अजित पवार म्हणाले.
काम करत असताना सर्वानी कायदा, नियम आणि संविधानाच्या अधीन राहून काम केले पाहिजे. अशा विचारांचा मी आहे. मी दुष्काळी दौऱ्यासाठी राज्यपालांना भेटलो नाही. आता महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नाही. काहीही प्रश्न विचारू नका. असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांनाही फटकारलं.