मुंबई : एकनाथ शिंदेनी (Ekanath shinde) बंड केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बंड केलेल्या आमदारांवर नेहमीच टीका टिपणी करतात. या चाळीस आमदारांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या व्यक्तीने तुम्हाला राजकीय अस्मिता दिली त्याच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला खंत वाटत आहे. यापैकी एकाचीही राजीनामा देण्याची हिंमत नाही. हे बंडखोर नेहमी महाराष्ट्रात गद्दार म्हणून फिरतील. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
बंडखोर गटातील आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला बोललाय.
“आम्ही गद्दार आहे आम्ही गटार आहे तर आम्हाला पक्षात कशाला पुन्हा बोलवतात कशाला या गद्दारांना पुन्हा पक्षात बोलवतात. गटाराला कशाला बोलवता ,असा प्रश्न शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला”. असं माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील बोलत होते. आदित्य ठाकरे नंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी बापूंवर हल्ला बोलला, “शहाजी बापू हे नौटंकी करणारे, गद्दारांनी शहाणपणा शिकूवू नये, पक्षाने आधार दिला म्हणून आमदार झाले. त्यांच्या नशिबातील ही शेवटची आमदारकी आहे, संतांच्या पवित्र भूमीत राहून संत तुकाराम त्यांना कधीच कळले नाही”. असं माध्यमांशी बोलताना विनायक राऊत बोलले.
शहाजी बापू माध्यमांशी बोलताना म्हणाले, “एकनाथ शिंदे (Ekanath shinde) आमचे नेते आहे आगामी निवडणुकीत आमच्या बॅनर वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो लागणार नाही त्या जागी एकनाथ शिंदे यांचा फोटो लागणार असे सांगितले. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरा करतात सभा घेतात भाषण करतात पण त्यांनी बाळासाहेबांची कॉपी करू नये बाळासाहेबांनी ती ठाकरीभाषा शोभत होती. बाप लेकांना ती भाषा शोभत नाही. असे बापू बोलले.