राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्येच आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे.
बिग ब्रेकिंग! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर
भाजपकडून कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने तर चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावललं आहे. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तारक मेहता फेम शैलेश लोढांनी घेतला संन्यास? फोटो व्हायरल
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केलं. आमचं कुटुंब कधीच साथ सोडणार नाही असं लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने म्हंटले आहे. ज्याला उमेदवारी मिळाले त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटंब राहिल, असं त्यांच्या मुलाने सांगितल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे .
कोल्ड्रिंक्सने भरलेला कंटेनर पलटी; कोल्ड्रिंक्स नेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी