ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवा पोशाखच का घालतात? वाचा याबद्दल सविस्तर माहिती

Why do doctors wear green during surgery? Read more about this

आपण बऱ्याचदा आरोग्य सेवा मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असतो. यावेळी डॉक्टर खूपदा पांढऱ्या कोट मध्ये दिसतात. मात्र जेव्हा शस्त्रक्रिया ( Green outfeet during Operation) सुरू असते. तेव्हा मात्र डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. यामागे देखील बरीच कारणे आहेत. खूप वर्षांपूर्वी डॉक्टर शस्त्रक्रिया करतानाही पांढऱ्या कपड्यातच राहायचे. मात्र 20 व्या शतकाच्या सुरूवातीला, एका सुप्रसिद्ध डॉक्टरांनी पांढऱ्या कापडाच्या जागी हिरव्या रंगाचा वापर केला.

पडळकरांचा मोठा खुलासा! बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी

शस्त्रक्रिया करताना हिरवे कपडे घातले तर डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आराम मिळेल. असे या डॉक्टरांना वाटले. हिरवा रंग आपले मन शांत ठेवतो, असे काही संशोधक आणि तज्ज्ञांचे मत आहे. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी डॉक्टरांना बराच वेळ ऑपरेशन थिएटरमध्ये राहावे लागते. अशा वेळी डॉक्टरांना रक्ताचा लाल रंग पुन्हा पुन्हा पहावा लागतो.

मोठी बातमी! पॅराशूटचा बेल्ट निसटून युवकाचा मृत्यु

हा लाल रंग जास्त काळ डोळ्यांसमोर ठेवल्याने डॉक्टरांच्या डोळ्यांवर खूप ताण येण्याची शक्यता असते. यामुळे शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना सतत लाल रंग दिसू नये, म्हणून डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये हिरव्या रंगाचा पोशाख घालतात. तसेच सतत लाल रंग पाहिल्या नंतर पांढऱ्या रंगावर नजर पडली तर डॉक्टरांना रंगाचे भ्रम ( Visual illusion) देखील होऊ शकतात. यासाठी शस्त्रक्रिया करताना हिरव्या रंगाचे कपडे घालतात.

शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींची तरतूद; अधिवेशनात घेतला ‘हा’ निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *