Site icon e लोकहित | Marathi News

मुलींना लवकर मासिक पाळी का येते? नेमक काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर…

Why do girls have early periods? What exactly is the reason? Know more...

मुलींना मासिक पाळी ( Menstrual Cycle) येण्याचे वय साधारणतः १० ते १२ वर्षांदरम्यान येते. मात्र कोरोना नंतरच्या काळात ६ ते ९ वर्षांच्या वयोगटातील मुलींना मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींना अगदी कमी वयात पाळी येणे याला ‘अर्ली मेनार्की’ असे म्हणतात. याला शास्त्रीय भाषेत ‘प्रिकाॅशस प्युबर्टी’असे म्हणतात. दरम्यान मुलींना लवकर पाळी येण्याची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. ( Reasons behind early menstrual cycle)

अभिनेत्री रश्मिका मंदानाने केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझ्या आईमुळे माझे आयुष्य…”

कमी वयात पाळी येण्याची कारणे

१) विविध आजार : थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास व मेंदूमधील पिच्युरीटी नावाच्या ग्रंथीमध्ये गाठ निर्माण झाल्यास पाळी लवकर येते. तसेच किडनी जवळील ॲड्रिनल ग्रंथीमध्ये बदल झाल्याने पाळी लवकर येऊ शकते.

नागराज मंजुळे यांनी केली नवीन चित्रपटाची घोषणा; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२) बैठी जीवनशैली व स्थूलपणा : मुलींच्या शरीरात वजनाच्या ६६ टक्के फॅट्सचे प्रमाण वाढले की मासिक पाळी येते. हे प्रमाण साधारणतः ११ ते १४ वयात वाढते. मात्र स्थूल मुलींमध्ये वयाच्या आधीच फॅट्सचे प्रमाण वाढते आणि लवकर पाळी येते. तसेच शारीरिक हालचाल नसली व शरीरात स्थूलता असली की पाळी लवकर येते.

“पोलीस एका गाडीच्या मागे लागले अन् गाडी थेट…”; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

३) वातावरण व पर्यावरण बदल : वातावरण व पर्यावरण बदल हे मासिक पाळी लवकर येण्याचे मुख्य कारण आहे. याला ‘एनव्हाॅर्यमेण्टल डिसरप्टर’ असे म्हणतात. हवेतील प्रदूषण, फळ भाज्यांवर मारलेली कीटकनाशके या गोष्टी मुलींच्या हार्मोन्सवर परिणाम करतात. यामुळे मासिक पाळी लवकर येते.

अरेरे! राखी सावंतने केली हद्दपार; थेट टाॅप न घातलताच कारमधून उतरली अन् व्हिडीओ झाला व्हायरल

मासिक पाळी लवकर आल्याने वाढतात हे धोके

कमी वयात मासिकपाळी येणे हे मुलींच्या आरोग्यासाठी धोकादायक असते. यामुळे त्यांना पुढे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच लवकर पाळी आल्याने मुलींमध्ये वयापेक्षा जास्त समजूतदापणा येऊन त्यांच्यावर मर्यादा येतात.

“…अन् बैलांना आपल्यासमोर जीव सोडताना पाहून शेतकरी ढसाढसा रडला”

१) मधुमेह होण्याची शक्यता निर्माण होते.
२) ह्रदयविकाराचा धोका वाढतो.
३) अर्धांगवायू किंवा ब्रेन स्ट्रोक येणे
४) मानसिक आरोग्य बिघडणे

Spread the love
Exit mobile version