लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण आहे. त्यामुळे अनेकजण आपले लग्न वेगळ्या पद्धतीने करत असतात. आजकाल बरेच जण मोठं मोठ्या हटेल्समध्ये लग्न करत असतात. आपल्या महाराष्ट्रातील काही लग्न तर एकदम सेलिब्रेटींच्या लग्नासारखी होतात. मात्र लग्न कितीही नवीन पद्धतीने केलं तरी आपल्याला काही जुन्या पद्धती विसरता येत नाही. जसे की लग्न झाल्यावर महाराष्ट्रामधील बरीच जोडपी जेजुरीला दर्शनासाठी जात असतात. मात्र लग्न झाल्यानंतर नवीन जोडपे जेजुरीलाच का जातात? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.
“तू चीज बडी हैं मस्त मस्त…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा Video
महाराष्ट्रात अनेक लोकांच्या घरी लग्नानंतर सत्यनारायणाची पुजा घातली जाते, त्यानंतर नवी जोडपी देवदर्शनासाठी जातात. यावेळी शक्यतो जेजुरीला प्रथम प्राधान्य दिल जात. याच कारण असं की, लग्नांनंतर अनेक जोडपी आपल्या कुलदैवताच दर्शन घेण्यासाठी जातात मात्र बऱ्याच लोकांचा जेजुरीचा खंडेराया हा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक त्याच्या दर्शनासाठी जात असतात.
मालेगावमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार; आज होणार जाहीर सभा
त्याचबरोबर शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार व्हावा यासाठी अनेक जोडपे देवाच्या दर्शनासाठी जातात. त्याच कारण असं की, खंडेराया हे शिवाचं रुप असल्याचं माणलं जातं, आणि म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप आहे. त्यामुळे बरीच नवीन जोडपी लग्नानंतर जेजुरीला दर्शनाला जातात.
सावधान! राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय; पाहा काय आहे परिस्थिती?